Maharashtra

मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

By PCB Author

August 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

यापूर्वी त्यांनी फोनवरुन पुरग्रस्तांची विचारपूस केली आणि पिडितांना धीर दिला. तसेच लवकरात लवकर मी तुम्हाला भेटायला येतो असे आश्वासन दिले होते . पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी तयार आहे. पूरग्रस्त बाधित गावांना जी मदत लागेल ती मदत आम्ही करू असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला, आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. आतापर्यंत पूरग्रस्तांना अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. गावागावांमधून नागरिक होईल तशी मदत करत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी माणुसकी जपत पूरग्रस्तांना मदत करत आहे.