Notifications

#MeToo: सोशल मीडियावर भाष्य नकोच; दिल्ली हायकोर्टाचे महिला पत्रकाराला आदेश

By PCB Author

October 12, 2018

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने सोशल मीडियावरुन वाचा फुटत आहे. मात्र, गुरुवारी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने एका महिला पत्रकाराला सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी लैंगिक छळाच्या आरोपांबाबत भाष्य करु नये, असे आदेश दिले आहेत.