#MeToo मोहीम; मोदीसाहेब तुमच्यावरही आरोप होतील, वेळीच हस्तक्षेप करा- शक्ती कपूर

0
780

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर देशभरात #MeToo मोहीम सुरू झाली आहे. यात बॉलिवूड, राजकारण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर अडकले आहेत. सध्या अनेकांवर आरोप होत आहेत. दिग्दर्शक साजिद खानला सिनेमातून वगळले, हृतिक रोशनवर आरोप झाले, अमिताभ बच्चन यांचेही नाव आले आहे, उद्या मोदीसाहेब तुमच्यावरही आरोप होतील, तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न अभिनेते शक्ती कपूर यांनी उपस्थित करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.  

अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर न करता, जोपर्यंत न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत बदनामी रोखावी, मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असो, न्यायालयात सिद्ध झाल्यानंतरच त्याचे  नाव जाहीर करण्यात यावे,  असे आवाहन शक्ती कपूर यांनी केले आहे.

नुसते आरोप झाल्याने अनेकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. त्यांचे संपूर्ण करिअरच संपते. त्याला नोकरीवरुन  काढून टाकले जाते. स्वत:ची बायका मुलेही त्याला संशयाने पाहू लागतात, असे शक्ती कपूर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी लक्ष घालून याबाबत कायदा करावा, असे शक्ती कपूर यांनी एका  ऑडिओ क्लिपमध्ये  म्हटले आहे.