#MeToo मोहीम; ‘तुम्हीच सांगा आता कोणी कोणाला किस मागितला? चेतन भगतने सादर केले पुरावे

1503

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी २०१३ मध्ये इरा त्रिवेदीने केलेल्या मेलचा स्क्रिनशॉट शेअर करत प्रश्न विचारला की, ‘तुम्हीच सांगा आता कोणी कोणाला किस मागितलं? इराने मला पाठवलेल्या या मेलमधील शेवटची ओळ वाचा. ज्यामध्ये तिने kiss u miss u असे लिहिले आहे. तिने माझ्यावर जे आरोप केले आहेत ते साफ चुकीचे आहेत. माझे आणि माझ्या कुटुंबियांचे मानसिक शोषण आता तरी थांबवा कारण या मोहिमेचा अनेकजण चुकीचा फायदा घेत आहेत.

लैंगिक शोषणाच्या आरोप केल्याप्रकरणी चेतन भगत याने आता सोशल मीडियावर काही पुरावे सादर केले आहेत. ‘#MeToo मोहिमेचा मीच पीडित,’ म्हणत चेतनने इराच्या मेलचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. इरानेच चेतन भगतवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता तरी माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी करणे थांबवा, मी आरोपी नाही असे स्पष्टीकरण चेतनने दिले होते.

एका महिलेने चेतन भगत यांच्यावर आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्स अॅपवरील चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे संबंधीत महिलेची माफी मागितली होती. या महिलेशी आपण आगामी ‘वन इंडियन गर्ल’ या कादंबरीवरही चर्चा केल्याचा दावा भगत यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता.