#MeToo; नाना-तनुश्रीचा वादात राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

0
2409

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – #MeTooमोहिमेमुळे सुरु झालेला अभिनेते नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद आता विकोपला टेकला आहे. याच वादामध्ये आलेली अभिनेत्री राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राखी सावंतला आता अटक होण्याची शक्यता आहे.  

तनुश्रीने टक्कल केले, ती अंमली पदार्थांचे सेवन करायची, असे वक्तव्य राखीने तनुश्री आणि नानाच्या वादात पडून केले होते. याच प्रकरणी राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शिवाय, प्रत्यक्षात मात्र तनुश्रीनं विपश्यना करत असताना बौद्ध धर्माच्या रिवाजाचे आचरण करत होती. त्यामुळे राखीच्या वक्तव्यामुळे बौद्ध धर्माचा अपमान झाला आहे, असे भीम आर्मीने सांगितले आहे. दरम्यान, बौद्ध धर्म अनुसुचित जातींमध्ये येतो. त्यामुळे धर्माचा अवमान करणे गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास राखीला तुरुंगवास होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.