#MeToo: अकबर मला पकडून जबरदस्तीने चुंबन घेत होते – सीएनएन पत्रकार

0
886

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – देशातील अनेक महिला पत्रकारांनी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेले असताना आता अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने अकबर यांच्यावर आरोप केला आहे.

माजीली डी प्यु कॅम्प असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. ती सीएसएन वृत्तवाहिनीत काम करते. २००७ साली मी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना एम.जे.अकबर यांनी आपला लैंगिक सुखासाठी छळ केला होता असा आरोप माजीली कॅम्पने केला आहे. त्यावेळी ती १८ वर्षांची होती.

माजीली कॅम्प त्यावेळी अकबर यांच्या हाताखाली एशियन एजमध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत होती. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मला संधी दिली म्हणून मी आभार मानण्यासाठी अकबर यांच्या केबिनमध्ये गेली. त्यावेळी ही घटना घडली असे माजीली कॅम्पने सांगितले.

मी आभार मानण्यासाठी हात पुढे केला अकबर यांनी मला जवळ खेचले व माझे चुंबन घेतले. ते माझ्यावर चुंबनाची जबरदस्ती करत होते. मी तशीच तिथे उभी होते असे कॅम्पने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. एम.जे.अकबर वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी आपल्याला त्रास दिला होता असे या महिलांनी म्हटले आहे. अकबर सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांनी आपल्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.