महात्मा फुले महाविद्यालयाचा निर्माल्य संकलनाचा उपक्रम

0
331

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने रहाटणीतील पवना घाट येथे गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून जवळपास तीन टन निर्माल्य संकलन करून मूर्ती विसर्जन हौदामध्ये करावे व मूर्तीदान करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.

याद्वारे जल प्रदूषण होऊ नये, जलचर प्राण्यांना धोका पोहचू नये, यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे पर्यावरण जागृतीच्या संबंधित तयार करण्यात आलेल्या फलकाच्या माध्यामातू प्रबोधन केले. ‘जल प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा’ ‘पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा’ ‘निर्माल्य संकलन करू या जल प्रदूषण टाळू या’ ‘गणपती बाप्पा मोरया पर्यावरण वाचवू या’ असे संदेश नागरिकापर्यंत पोहचवून पर्यावरण जागृती विषयी सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे २४ विद्यार्थी  सहभागी झाले होते.

या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संदीप नन्नावरे व प्रा. इसाक शेख यांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.