श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

0
812

थेरगाव, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र नाभिक महामंडळाची पिंपरी चिंचवड शाखा व पंचक्रोशितील भजनी मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी थेरगाव-गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात साजरी करण्यात आली. त्यावेळी दत्तात्रेय महाराज फरांदे यांचे किर्तन झाले. बहुजन समाजाने एकत्र येऊन संत सेना महाराजांची पुण्यातिथी साजरी केल्यामुळे समतेची व बंधुभावाची भावना वाढीस लागु शकते, अशी भावना यावेळी फरांदे महाराजांनी व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

तसेच लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माऊली महाराज वाळुंजकर, महामंडळाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा अनिता मगर, मगरसेविका रेखा दर्शिले, नगरसेवक अॅड. सचिन भोसले, जांबे गावचे सरपंच गणेश गायकवाड, रविकांत रसाळ, माजी उपसरपंच अनिल मगर यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष अशोक मगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर शुभम मंडलीक, यशवंत आपुरे, किरण मगर, शांताराम भालेराव, गणेश राऊत, गोरक्षनाथ रसाळ, दिपक टेमगिरे, चंद्रकांत गायकवाड, नितीन सुरवसे, गणेश वाळुंजकर, सुशिल रसाळ, अमोल कस्तुरे, प्रकाश क्षीरसागर, दशरथ मगर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सुखदेव महाराज बुचडे यांनी केले, तर जांबे गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी आभार मानले.