LSFPEF च्या लोकमान्य होमिओपथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया तर्फे ‘अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्यांचे वितरण

0
481

पिंपरी, दि.१(पीसीबी) – आयुष मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार LSFPEF च्या लोकमान्य होमिओपथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी अर्सेनिक अल्बम 30 हया रोगप्रतिकारक शक्ति वाढविणारया औषधाचे वितरण कोरोना योद्धे व समाजातील गरजवंत नागरिकांना एका मोहिमेद्वारे केले.

या मोहिमेचा एक भाग म्हणून अर्सेनिक अल्बम 30 च्या 1700 बाटल्यांचे वाटप केले.

1)पोलीस उपायुक्त सौ स्मिता पाटिल चिन्चवड विभाग – 500 बाटल्या.

2) पोलीस उपायुक्त श्री विनायक ढाकणे
चिन्चवड विभाग 2 – 500 बाटल्या

3) तात्या बापट स्मृति प्रतिष्ठान चिन्चवड –
80 बाटल्या

4) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे –
80 बाटल्या

5) एफ़् एम लोजिस्टीक कंपनी -80 बाटल्या

वरील उदात्त कारणासाठी राबवलेल्या हया मोहिमेला LSFPEF चे अध्यक्ष मा. श्री. निहाल पानसरे. प्राचार्या डॉ. नंदिनी जोशी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश क्षीरसागर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. लोकमान्य रुग्णालयाच्या इतर कर्मचारी वर्गाचे सहाय्य मिळाले.