काँग्रेच्या संकटामध्ये वाढ; विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील जागांसाठी मुलाखती सुरु

0
350

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. या पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मतदासंघातून योग्य तोच उमेदवार निवडण्यात येणार आहे. आज मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. मुंबईतील ३६ विधानसभा जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असल्याने काँग्रेच्या संकटामध्ये वाढ होणार असल्याचे चित्र दिसते .

वंचित आघाडीतर्फे दादरमधील आंबेडकर भवन या ठिकाणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखाताई ठाकूर, किसन चव्हाण यांचे  संसदीय मंडळ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील . विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे . मात्र प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत जाणार की हे अद्यापही स्पष्ट केले नाही. आता ते राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकदुखी वाढली आहे .