अपक्ष उमेदवाराला धक्काबुक्की करणाऱ्या पोलिस निरिक्षकावर कारवाईची मागणी

0
532

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवाराला धक्काबुक्की करून पैशाची मागणी करणाऱ्या पोलिस निरिक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अपक्ष उमेदवाराने पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.  

अजय लोंढे असे त्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. लोंढे यांनी निवेदनात म्हटले आहे की,  निगडीतील हेगडेवार भवन निवडणूक कार्यालयात निवडणूक खर्च तपासणी प्रक्रियेसाठी चिंचवड येथील चाफेकर चौकातून रिक्षामध्ये जात असताना पोलिस निरिक्षक विश्वजित खुळे यांनी अडविले. त्यावेळी जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करत चिंचवड पोलीस स्टेशनला ढकलत नेले. तसेच २५ हजारांची मागणी केली. त्यामुळे खुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करीन. असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, लोंढे यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले होते. चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडून दिले. असे पोलिस निरिक्षक खुळे यांचे म्हणणे आहे.