Maharashtra

गिरीश महाजनांचा तात्काळ राजीनामा घ्या, धनंजय मुंडेंची मागणी

By PCB Author

August 09, 2019

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोटीतून जाताना सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियात ट्रोल झाला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीनंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून त्यांना परखड शब्दात सुनावले आहे. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.

महापूर पाहणीवेळी मंत्री @girishdmahajan आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही? @Dev_Fadnavis जी, या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. pic.twitter.com/7wM0a2bE5m

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 9, 2019

तसेच महापूर पाहणीवेळी मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही? मुख्यमंत्रीसाहेब, या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा ,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. अशी मणी त्यांनी केली आहे.