Maharashtra

राज ठाकरेंना ईडी ची नोटीस येणार हे मला आधीच माहिती होते – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

August 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तूळात चर्चांना ऊधाण आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंना ईडी ची नोटीस येणार हे मला आधीच माहिती होते. तसे मी त्यांचे नेते बाळा नांदगांवकर यांनादेखील सांगीतले होते. ही माहिती बाळा यांनी राज ठाकरेंपर्यंत पोहचवली की नाही याची मला कल्पना नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.