Maharashtra

‘ते एकवेळ मला सोडतील पण शरद पवार साहेबांना सोडणार नाहीत’

By PCB Author

July 25, 2019

मुंबई, दि. 25 (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या भाजप प्रवेशासाठी स्व. गोपीनाथ मुंडे हे आग्रही होते. मात्र, आव्हाड तयार नव्हते. याबाबत मुंडे यांनी आव्हाड यांच्या पत्नीची समजूत काढली. परंतू, त्यांनी मुंडे साहेबांना सांगितले, कि “ते एकवेळ मला सोडतील, पण आदरणीय शरद पवार साहेबांना सोडणार नाहीत.” अशा आशयाची पोस्ट #एकनिष्ठ या हॅशने सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यावर काही वर्षानंतरच पक्षातील एक युवक नेत्याच्या मागे ”तु भाजपात यायलाच पाहिजे” असा आग्रह स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्या युवक नेत्याच्या (बर त्यांचे कौटुंबिक संबंध होते बरं का) मागे लावला. ज्यासाठी खुपदा प्रयत्न केल्यावरही तो युवक नेता तयार होतच नाही, हे पाहिल्यावर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की त्याला समजुन सांग. भाजपात त्याचे भविष्य आहे, तिथे तो मोठा होणार नाही, वगैरे. तेव्हा जे उत्तर युवक नेत्याच्या पत्नींनी स्व. मुंडे यांना दिले, ते विचारसरणी व नेत्यावर निष्ठा काय असते. हेच अधोरेखित करणारे होते. त्यांच्या पत्नींनी मुंडे साहेबांना सांगितले कि “ते एकवेळ मला सोडतील पण आदरणीय शरद पवार साहेबांना सोडणार नाहीत.”

चांगली राजकारणात मोठं करणारी ऑफर असुनही स्पष्ट नकार देणारा तो नेता होता डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आपल्या पतीची त्याच्या नेत्याप्रती व विचारसरणीप्रती निष्ठा किती कणखर आहे, हे सांगणारी स्त्री म्हणजे सौ. ऋतावहिनी आव्हाड.