Banner News

सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १ हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – सांगली, कोल्हापूर येथील १ हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी  पीक  कर्ज घेतली आहेत. त्यांची घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फडणवीस सरकारने पूरग्रस्तांसाठी घेतलेला हा मोठा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, ऊस यासाठी घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम माफ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण त्याने कोणतीही कर्ज घेतलेले नसेले अशा शेतकऱ्याला देखील सरकार आर्थिक मदत करणार आहे, त्यासाठी तीनपट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. तर शेतजमीन देखील नापीक झाली आहे. तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिक वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने १ हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काही पिके घेतली आहेत, त्या पिकांसाठी घेतलेले कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळजवळ बहुतांश शेतकऱ्यांना १ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा फायदा देण्याचा प्रयत्न करू, पंतप्रधान आवास योजनेतून ज्या घरांचे नुकसान झाले आहे. ती घरे बांधून देणार आहोत. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर १ लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहेत, अशी ही माहिती फडणवीस यांनी दिली.