महायुतीला धक्का! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची भाजपमधून बंडखोरी

102

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक होते. मात्र, शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. महायुतीत पिंपरी मतदारसंघ हा शिवसेनेला गेल्याने शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे गोरखे यांनी भाजपमधून बंडखोरी केली आहे.

गोरखे यांनी आज रॅली काढत आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. गोरखे यांच्यासोबत भाजप नगरसेवक तुषार हिंगे, शीतल शिंदे, नगरसेविका सुजाता पालांडे, काँग्रेसचे मनोज कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत.