Chinchwad

चांद्रयानचा रिमोट गौराईच्या हाती, काळेवाडीतील सुरेखा भागवत यांचा देखावा (व्हिडीओ)

By PCB Author

September 06, 2019

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – काळेवाडीतील सुरेखा शंकरराव भागवत (रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर) यांनी आपल्या घरी गौरी गणपतीनिमित्त चांद्रयान- २ हा देखावा सादर केलेला आहे. यामध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फिरणारे चांद्रयान दाखविण्यात आलेले असून गौरी या महिला शास्त्रज्ञांच्या स्वरुपात दाखविण्यात आल्या आहेत.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयानाचे प्रक्षेपण पाहताना दाखविण्यात आले आहेत. हा नैत्रदिपक देखावा पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. संकल्पना धनश्री दिपक भागवत यांची असून निर्मिती दिपक शंकरराव भागवत यांनी केली आहे. तर हभप शंकरराव आनंदराव भागवत, ज्येष्ठ पत्रकार पदमाकर दत्तात्रय जांभळे यांनी मार्गदर्शन केले आहे.

देखाव्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/6NMPqySDAOU