Bhosari

बेकायदेशीर नोंदणीप्रकरणी दुय्यम निबंधक व तलाठ्यासह पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा

By PCB Author

September 16, 2019

दिघी, दि. १६ (पीसीबी) – रेडझोनमधील जमीनीच्या बेकायदेशीर विक्रीची नोंदणी केल्याप्रकरणी हवेली क्रमांक २० चे दुय्यम निबंधक व गाव कामगार तलाठी यांच्यासह पाच जणांवर दिघी पोलिस ठाण्यात फसवणूकी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मधुकर भिकू गलबिले (वय ९०, रा. वडमुखवाडी) यांनी फिर्याद दिली.

उद्धव दगडू गिलबिले, पंडीत दगडू गलबिले, लक्ष्मण दगडू गडबिले, दुय्यम निबंधक गणेश वैकुंठे, तलाठी एस. डी. देशमुख अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हा प्रकार २८ ऑगस्ट २०१८ ते १५ सप्टेंबर २०१९ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडझोनमधील जमीनीच्या खरेदी-विक्रीला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र, फिर्यादी यांची सर्व्हे नंबर १७४ मधील जमीनीवर दिघी रेडझोन मॅगझीन असा शिक्का असतानाही जमीनीची बेकायदेशीर विक्री करण्यात आली. याचे बनावट दस्तावेज दुय्यम निबंधक यांनी नोंदवून घेऊन तलाठ्याने त्याची सातबाऱ्यावर नोंद केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक तरंगे करत आहेत.