Pimpri Chinchwad Bulletin https://pcbtoday.in Sat, 27 Apr 2024 12:58:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.5 देशाच्या सुरक्षिततेसाठी विचारपूर्वक मतदान करा – श्रीरंग बारणे https://pcbtoday.in/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ Sat, 27 Apr 2024 12:58:07 +0000 https://pcbtoday.in/?p=168218 राज्यघटना बदलणार हा निव्वळ कांगावा – बारणे

… तर जास्तीत जास्त विकास निधी मिळेल – प्रशांत ठाकूर

दि २७ एप्रिल (पीसीबी ) पनवेल – ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) केले. राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा निव्वळ कांगावा असल्याचा आरोपही बारणे यांनी केला.

पनवेलच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात खैरणे येथे झालेल्या चौक सभेत खासदार बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच एकनाथ देशेकर, राजेंद्र गोंधळी, संभाजी जगताप, सरपंच शैलेश माळी आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, देश कोणाच्या हातात सोपवायचा, याचा निर्णय या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. देशाला सुरक्षित ठेवू शकेल, अशा भक्कम हातांमध्ये देश सोपवणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून विचारपूर्वक मतदान करावे.

देशात व राज्यात एका विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक गतीने होतो. केंद्राप्रमाणे राज्यातही चांगले सरकार आहे. जनतेच्या संकटाला धावून जाणारे सरकार आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व आहे. कालबाह्य झालेले ब्रिटिश कायदे बदलून त्यात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.‌ विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे मोदी हे राज्यघटना बदलणार असल्याचा कांगावा ते करीत आहेत. आपल्या देशात कोणीही घटना बदलू शकत नाही, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली आहे. जगभर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही बारणे म्हणाले.

जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी…

पनवेल विधानसभा मतदारसंघाला शासनाचा जास्तीत जास्त निधी हवा असेल, तर खासदार बारणे यांनाही जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणे हे आपलं कर्तव्य आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पंतप्रधान मोदी व खासदार बारणे यांच्यामुळे पैसे परत मिळू शकले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील, प्रल्हाद केणी यांचीही यावेळी भाषणे झाली.

खैरणे येथील सभेनंतर बारणे यांनी नितळस, तोंडरे, पेंधर, नावडे आदी गावांना भेट देऊन मतदारांशी संपर्क साधला.

]]>
पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन https://pcbtoday.in/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9/ Sat, 27 Apr 2024 12:52:29 +0000 https://pcbtoday.in/?p=168214 दि २७ एप्रिल (पीसीबी ) पुणेः पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने झालं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषवले. पुण्याचे पहिले शिख महापौर अशी त्यांची वेगळी ओळख होती.
मोहनसिंग राजपाल हे गेले महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

]]>
कॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश https://pcbtoday.in/%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%8f%e0%a4%87-%e0%a4%8f%e0%a4%b0/ Sat, 27 Apr 2024 12:42:45 +0000 https://pcbtoday.in/?p=168209 पिंपरी, दि. २७ – कॅलिफोर्निया, यूएसए येथे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (SAE) इंटरनॅशनल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसएई एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईच्या “टीम मावेरिक इंडिया” या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. ७५ देशातील विविध संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत “टीम मावेरिक इंडिया” संघाने विविध गटात उल्लेखनीय यश मिळवून एकूण स्पर्धेत जागतिक पातळीवर दहावा क्रमांक पटकावला आणि नेत्रदीपक यश मिळवले. या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तांत्रिक क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेडिओ-नियंत्रित विमानाच्या डिझाइन, अभियांत्रिकी आणि उड्डाण क्षमतांचे मूल्यांकन उल्लेखनीय होते. या स्पर्धेत जगभरातील संघ नाविन्यपूर्णता, तांत्रिक कौशल्ये आणि टीमवर्कचे प्रदर्शन करतात.
पीसीसीओई टीमचे नेतृत्व रिफा अन्सारी हिने केले. यामध्ये पार्थ देशमुख, मिहीर रमेश झांबरे, अनिकेत पिंगळे, अपूर्वा परदेशी, तन्मय राजपूत, ओम दुर्गे, प्रणाली मगदूम, आयुष बोडखे, सर्वेश पाटील, अनिरुद्ध पाटील, मृणाल सागरे, तृप्ती बावनकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. ए. देशमुख, प्रा. डॉ. नरेंद्र आर. देवरे, प्रा. चंदन इंगोले यांनी मार्गदर्शन केले.
पीसीसीओईच्या मोटरस्पोर्ट्स संघाचे हे यश विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि व्यावहारिक कौशल्ये वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. स्पर्धात्मकता आणि उत्कृष्टतेच्या संस्कृतीला चालना देऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुण अभियंत्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पीसीसीओईचे व्यवस्थापन नेहमीच पाठबळ देते असे पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

]]>
तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती https://pcbtoday.in/%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a4%bf/ Sat, 27 Apr 2024 12:34:56 +0000 https://pcbtoday.in/?p=168206 दि २७ एप्रिल (पीसीबी ) – मीरा रोड मध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिच्या कडून लाखो रुपये उकळण्यात आहे होते. तसेच तिचे केस काढून तिला विद्रुप करण्यात आले होते. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पीडित तरुणी २६ वर्षांची आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याण मध्ये राहणाऱ्या मोहसीन शेख (२२) याच्या सोबत झाली होती. तिने नया नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार मोहसीन याने तिला गुंगीकारक पदार्थ टाकून बिर्याणी खायला दिली होती. यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर मोहसीन याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढली.यानंतर तो तिच्याशी वारंवार बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित करत होता. यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर सतत तिला मारहाण करू लागला. तिच्या डोक्यावरील केसही काढून विद्रुप केले होते. तिच्याकडून पावणे तीन लाख रुपये देखील उकळले, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख, यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिने देखील इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले, अशी तक्रार पीडितेने तक्रारीत केली आहे. या तक्रारी वरून नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवून, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

]]>
पिंपरी-चिंचवड मधील डॉक्टरांचा बारणे यांना पाठिंबा https://pcbtoday.in/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f/ Sat, 27 Apr 2024 12:28:31 +0000 https://pcbtoday.in/?p=168201 मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे लवकरच निराकरण – बारणे

आकुर्डी, दि. 27 – पिंपरी- चिंचवड मधील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना काल (शुक्रवारी) एकमुखी पाठिंबा जाहीर केला. देशाच्या आरोग्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे, असे मत खासदार बारणे यांनी व्यक्त केले.

शहरातील विविध डॉक्टर संघटनांची संयुक्त बैठक आकुर्डी येथे झाली. त्यात बारणे बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप कामत, डॉ. गणेश भोईर, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. माया भालेराव, डॉ. सुभाष जाधवर, डॉ. संजीव संभूस, डॉ. अमित नेमाणे, डॉ. सुनील शेट्टी, डॉ. श्रीकृष्ण जोशी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न व समस्या यांचे निराकरण लवकरच करण्यात येईल. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते.

डॉक्टरांप्रमाणेच आमच्याकडेही दररोज अनेक लोक त्यांची दुखणी घेऊन येतात व आम्ही आमच्या परीने त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो, असे बारणे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक भूमिका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फार मोठा दबदबा आहे. देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात, असे बारणे म्हणाले. गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा बारणे यांनी यावेळी सादर केला.

डॉ. दिलीप कामत म्हणाले की, खासदार बारणे हे शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आमच्यासाठी हा हक्काचा माणूस आहे. त्यांची हॅटट्रिक होण्यासाठी आम्ही सर्व वैद्यकीय व्यावसायिक त्यांना एकमुखी पाठिंबा देत आहोत. डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडविण्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.

बैठकीनंतर खासदार बारणे यांनी उपस्थित डॉक्टरांशी वैयक्तिक संवादही साधला. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.

]]>
पराभवाच्या भीतीने सुजय विखे परिवार हादरला https://pcbtoday.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b5/ Sat, 27 Apr 2024 12:22:10 +0000 https://pcbtoday.in/?p=168196 दि २७ एप्रिल (पीसीबी ) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. अशात आता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा विखेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामागे खासदार विखे यांचे रडीचे राजकारण असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.
शरदचंद्र पवार गटातून अधिकृत उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये. मात्र सुजय विखे यांच्या पराभवाच्या भीतीने सुजय विखे यांनी डमी उमेदवार दिला असून रडीचा डाव खेळल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. विखे पाटलांची गेली 50 वर्षांची डमी उमेदवार उभा करण्याची परंपरा यावेळी देखील कायम राखली असल्याचा दावा राजेंद्र फाळके यांनी केला, ते नगर राष्ट्रवादी भवनातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पत्रकार परिषदेमधून विखेंवर फाळके यांनी हल्लाबोल केला. पुराव्यासह त्यांनी सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये विखेंची पोलखोल केली आहे. संपत्तीसाठी रक्तातील नाव भासवून भावाच्या ठिकाणी डमी व्यक्ती दिला होता. हेच काय तर आताच्या तलाठी भरतीमध्ये अनेक डमी उमेदवार पास झालेत असा दावा फाळके यांनी केला.

“विखे परिवार पुरता हादरला…”
आताच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना निलेश लंके हे जड जाताना दिसत आहेत. यामुळे आता विखे परिवार पुरता हादरून गेला आहे. विखे यांनी नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाचा साधर्म्य असणारा उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांच्या नावाचा फॉर्म दाखल करण्यात आला. नीलेश साहेबराव लंके हे मूळचे कामोठा, रायगड जिल्ह्यातील आहे. मात्र सुधारीत यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे, असं राजेंद्र फाळके म्हणालेत.
राजेंद्र फाळके यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. सुजय विखे आणि नीलेश साहेबराव लंके यांच्या उमेदवारी अर्जाचे प्रतिज्ञापत्रक डी. पी. अकोलकर यांच्याकडून दोन्ही प्रतिज्ञापत्रक घेतलेत. हा निव्वळ एक योगायोग नसून विखेंनी नीलेश साहेबराव लंके यांना उमेदवारीसाठी डमी बसवला असल्याचा आमचा पुरावा असल्याचा दावा फाळके यांनी केलाय.

माझ्याकडे दोन सुजय विखे संपर्कात होते. दोन्ही विखे हे लोणीमधील होते. सुजय रमाकांत विखे आणि सुजय दिगंबर विखे यांनी डमी अर्ज भरण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र आम्ही डमी राजकारण केलं नाही. रडीचा डाव खेळला नाही. नीलेश लंके यांच्या डमी उमेदवारीवर बोलणार नाही पण सुजय विखेंच्या डमी राजकारणाची पोलखोल मतदारसंघात वारंवार करत राहू, इशारा राजेंद्र फाळके यांनी दिला.

]]>
भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबईतून उमेदवारी https://pcbtoday.in/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e/ Sat, 27 Apr 2024 12:08:39 +0000 https://pcbtoday.in/?p=168193 दि २७ एप्रिल (पीसीबी ) – मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे.

यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे.

]]>
मी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही… https://pcbtoday.in/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be/ Sat, 27 Apr 2024 09:38:31 +0000 https://pcbtoday.in/?p=168190 “मित्रांनो ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत” असं अजित पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. “मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. तीन मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असं अजित पवार म्हणाले.

“वेल्हे-भोर पुण्याजवळ असूनही इथे MIDC, कारखाने नाहीत. खंडाळा तालुका सुद्धा दुष्काळी तालुका होता. आज खंडाळ्यात धरण झाल्यामुळे तिथली जमीन ओलिताखाली आली. रोजगार निर्माण झाले” असं अजित पवार म्हणाले. “काहींनी उमेदवार म्हणून येताना वल्गना केल्या की, जर आम्ही एमआयडीसी आणली नाही, तर 2019 मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही. पण ते मतं मागायला आले. तुम्ही निवडून दिलं. भावनिक होऊ नका. तुमच्या रोजी-रोटीची ही निवडणूक आहे. पुढच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही म्हणाल, मग अजित पवार तुम्ही काय करणार? मी माझ्या इथे काम करुन आलोय. बारामतीचा चेहरा-मोहरा बदलालय” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“मला विकास करायचा अनुभव आहे. रात्री 1 ला झोपलो, तरी 6 वाजता उठून काम करतो. मुंबई, पुणे, बारामती जिथे कुठे असेन, तिथे पाचला उठून सहाला कामाला लागतो. मला कामाची, लोकांचे प्रश्न सोडवण्याची, विकासाची आवड आहे. राज्याचं भलं करण्याचा प्रयत्न आहे” असं अजित पवार म्हणाले.

“आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही, मग पुन्हा यायच. मी, जर त्या ठिकाणी असतो, तर मला शरमेने लाज वाटली असती. कुठल्या तोंडाने जाऊ मत मागायला. मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही, तो पूर्ण करतो. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणस आहेत, त्यांना आपलस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो” असं अजित पवार म्हणाले.

]]>
अजूनही ‘नेहरू वाईट, काँग्रेस वाईट’चे गुऱ्हाळ…. https://pcbtoday.in/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0/ Sat, 27 Apr 2024 09:31:02 +0000 https://pcbtoday.in/?p=168187 एवढा बोगस प्रचार कधीच पाहिला नाही सत्ताधारी पक्षाकडून. अमित शहा म्हणतात शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा काय केलं? मोदी म्हणतात सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं? पण लोकांनी यांना दिलेल्या दहा वर्षात यांनी काय केलं हे दोघंही सांगत नाहीत. अजूनही ‘नेहरू वाईट, काँग्रेस वाईट’ हेच यांचं सगळं भांडवल आहे. आर्थिक योजना काय हेही आता बोलत नाहीत.

स्वच्छ भारत, नमामि गंगे, मेक इन इंडिया, अग्निवीर, जनधन अकाऊंट या संपूर्ण फसलेल्या स्वतःच्या योजनांवर एक शब्द बोलत नाहीत.

काय बोलणार? फक्त राडे करून ठेवले दहा वर्षात! दाखवण्यासारखं काय आहेच काय? फक्त देशाला ओरबाडून खाल्लं आणि ते चारचौघात सांगता येत नाही.

नोटबंदीचं वीस टक्के कमिशन कोणी खाल्लं? पीएम केअर फंड हा माहिती अधिकारात न येऊ देता आपल्या सार्वजनिक कंपन्यांकडून ३००० कोटी कोणी लाटले? इलेक्टोरल बाॅन्डमधून हजारो कोटी कोणी खाल्ले? या घोटाळ्यांबाबत ते काय बोलणार? कुठेच नसलेला अदानी जगातल्या पाच श्रीमंतांमध्ये कसा यावर काय बोलणार?

क्रूड तेलाच्या किंमती कमी होत असतानाही पेट्रोल ६६ रुपयांवरून १०७ रुपयांवर कसं गेलं? ४१० रूपयांचा गॅस ११०० रूपयांवर कोणी नेला? सर्वत्र वाढलेली महागाई, यावर काय बोलणार?

शेतकरी तर पुरता खचवला. एकट्या महाराष्ट्रात दोन महिन्यांत ४५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यावर हे शिंदे-फडणवीस-दादा गप्प का आहेत? काहीच का बोलत नाहीत? सोयाबीनचा भाव ४२०० आहे जो मोदींनी शपथ घेतांना २०१४ साली होता. दहा वर्षात खतं, औषधं, बियाणं यांच्या किंमती कुठल्याकुठे वाढल्या आणि उत्पन्न मात्र तितकंच राहीलं यावर बोलण्याची हिंमत नाही भ्रजपाच्या कोणत्याच नेत्याची.

आम्ही काॅर्पोरेट कंपन्यांना १४,००,००० कोटींची कर्जमाफी दिली पण शेतकर्‍याचं एक रुपयाचं कर्जही माफ केलं नाही हे संसदेत सांगणारं सरकार आता कोणत्या तोंडानं शेतकऱ्याला सामोरं जाणार?

परवा एका शेतकर्‍याची क्लिप व्हायरल झाली. त्यात तो म्हणतो की प्रत्येक शेतकरी किमान १ लाखाचं खत दरवर्षी विकत घेतो. मोदींनी त्याच्यावर १८ टक्के जीएसटी लावून माझे १८,००० घेतले. (मनमोहनसिंगांनी जीएसटी लावला नव्हता) आणि उदार होऊन माझ्या खात्यात याच पैशातून ६,००० टाकले म्हणजे मोदींनी माझेच वर्षाला १२,००० खाल्ले त्याचा हिशेब कधी करायचा? शेतकरी हातात आसूड घेऊन उभा आहे आता.

२०१९ ला पुलवामा केलं. त्याची पोलखोल सत्यपाल मालिकांनी करून वाट लावली. यावेळी तोही हातखंडा चालणार नाही कारण राष्ट्रवादाचा स्वार्थी वापर लोकांच्या लक्षात आला आहे आणि या प्रकरणानंतर विश्वासार्हताच संपलेली आहे. खरोखरच पाकिस्तान भारत युद्ध सुरू झालं तरी आता लोक म्हणणार हे निवडणुकीसाठी आहे! विश्वासार्हता एवढी संपली आहे की ‘मित्रो आज अप्रैल की २७ तारीख है’ असं म्हणाले तरी लोक एकदा कॅलेंडर बघून घेतात.

सर्व पातळ्यांवर आलेलं अपयश, संपलेली विश्वासार्हता आणि हुकूमशाहीवर लोक जागोजागी व्यक्त करत असलेला राग यामुळे आता प्रचारात फक्त चिडचीड, तेच ते सत्तर वर्षाच्या नावे नेहरू आणि काँग्रेसवर खडे फोडणं, तीच जुनी हिंदू-मुस्लिम भांडणं लावायची चाल आणि मंगळसूत्र वगैरे संबंध नसलेले विषय घेऊन प्रचार करावा लागत आहे.

एवढा विषारी आणि असहाय्य झाल्यासारखा सरकारी पक्षाचा निवडणूक प्रचार या देशानं पूर्वी कधीही पाहिला नव्हता.

]]>
कर संकलन विभागाच्या सिध्दी 2.0 प्रकल्पाला सुरुवात https://pcbtoday.in/%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%8d/ Sat, 27 Apr 2024 09:14:14 +0000 https://pcbtoday.in/?p=168184
  • मालमत्ता कर बिले वाटपाचा ‘श्रीगणेशा’
  • ओटीपीद्वारे मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्याचे महापालिकेचे आवाहन
  • पिंपरी – गतवर्षी महिला बचत गटाच्या वतीने मालमत्ता कराची बिले वाटपाचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षातही महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी ओटीपीद्वारे आपल्या मालमत्तेचा जोडलेला मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करावा, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

             पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 25 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यानुसार सव्वा सहा लाख बिलांची छपाई होऊन बिले वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षी प्रथमच बिलावर युपिक आयडी छापण्यात आला आहे. पालिकेमार्फत चालू असलेल्या सर्वेक्षणात ज्या मालमत्तांचे सलग क्रमांक (geo -sequencing) देऊन झाले आहेत त्या मालमत्तांच्या बीलावर युपिक आयडी दिलेला आहे. हा लक्षात ठेवण्यासाठी सोपा असून पुढील वर्षापासून सर्व मालमत्तांना युपिक आयडी दिलेला असेल. महापालिकेच्या सर्व सेवा सुलभ मिळण्यासाठी याचा नागरिकांना भविष्यात फायदा होणार आहे. 

    महापालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन

    महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गतवर्षीच सर्व सेवा आणि सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. एकही अर्ज ऑफलाईन स्विकारला जात नाही. मालमत्ता धारकांसाठी मोबाईल क्रमांक मालमत्तेला लिंक असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मालमत्ता धारकांना स्वतःचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी महिलांना देण्यात आलेल्या सिध्दी ॲपमध्ये मोबाईल क्रमांक ओटीपीव्दारे व्हेरिफाय करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महिला जेव्हा नागरिकांना बिल द्यायला येतील तेव्हा नागरिकांना मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी मागतील. तेव्हा ओटीपी देऊन सहकार्य करावे. मोबाईल क्रमांकाशिवाय सेवांचा ॲक्सेस करता येत नाहीत. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी मोबाईल क्रमांक दिला नाही, त्यांनी मोबाईल क्रमांक द्यावा. तसेच महापालिका मालमत्ता धारकांचा डेटा प्रायव्हसी जपण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे.

    5 हजार थकबाकीदारांना जप्ती पूर्व नोटीसा
    31 मार्च 2023 अखेर शहरातील 75 हजार 858 मालमत्ता धारकांकडे दहा हजार पेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 717 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्ता धारकांना बिलाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा देण्यात येत आहेत.

    र्वाधिक थकबाकीदार चिखली झोनमध्ये
    कर संकलन व कर आकारणी विभागाचे शहरात 17 झोन आहेत. यामध्ये सर्वाधिक थकबाकीदार हे चिखली झोनमध्ये 10 हजार 209, थेरगाव मध्ये 7 हजार 772, वाकड मध्ये 6 हजार 915 तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 1 हजार 694 थकबाकीदार आहेत.

    मतदान जागृतीत कर संकलन विभागाचाही हातभार
    पिंपरी-चिंचवड शहर हे मावळ, शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघात विभागले आहे. यामध्ये दि. 7 मे रोजी बारामती तर मावळ आणि शिरूरमध्ये दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता करांची बिले वाटत असतानाच जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिलेले मतदान जनजागृतीचे पॅम्प्लेटही घरोघर देण्यात येत आहे.

    ]]>