अभियंता दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघातर्फे अभियंत्यांचे सत्कार

0
796

पिंपळे गुरव, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड परिसरातील नितीन चीलवंत, नामदेव पवार, शाहूराज केदारे, युवराज भोसले, विजयानंद शिंदे, धैर्यशिल बुआ आदी अभियंत्यांचे सत्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांचे हस्ते संविधान व तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील नाईकनवरे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यावेळी सुनील नाईकनवरे, शंकर तांबे, केशव बोधले, शिवदास हंडे, अलका जोशी, सुनील काकडे, गणेश ढाकने  रघुनाथ घुगे भैरुजि मंडले उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अरूण पवार म्हणाले की, “महान अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस अभियंतादिन म्हणून भारतात साजरा केला जातो. ते एक महान भारतीय अभियंते होते. त्यांनी भारतासाठी बांधकाम क्षेत्रात केलेल्या कामांना आपण एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश इंगो यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले.