Maharashtra

राज ठाकरेंना ईडीची नोटीस म्हणजे सुडबूद्धीचं राजकारण – राजू शेट्टी

By PCB Author

August 19, 2019

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहीनुर प्रकरणात ईडीने चौकशीची नोटीस पाठवली आहे. याबाबत बोलताना हातकणंगेलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना अशा प्रकारची नोटीसम जाणे ही या सरकारची दडपशाही आहे. हे प्रकरण फार जूने आहे. त्यामुळे यात काही तथ्य असते तर आघाडी सरकारने नक्कीच कार्वाई केली असती किंबहूना राजकीयदृष्ट्या विचार केला तर राज ठाकरेंची मनसे आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षाच्या बाजूने होती. मात्र, आता राज यांनी सत्ताधारी सरकारच्या विरोधात आवाज उठवला असून ईव्हीएम विरोधात ऊभे राहिले आहे. म्हणूनच ऐन निवडणुकीच्याघाती राज ठाकरेंवर ही कार्रवाई करण्यात येत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

तसेच राजू शेट्टी पूढे म्हणाले, ईडी ला एवढीच भ्रष्टाचाराची चिंता आहे तर आतापर्यंत काय ते निद्रावस्थेत होते काय असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारकडून अशा प्रकारचे राजकारण म्हणजे नक्कीच ईव्हीएम मध्ये टॅंम्परिंग होते असावे याविशयी दाट शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.