प्रगती नाईकरे एअर रायफलशूटिंग मध्ये प्रथम

0
403

आकुर्डी, दि. १७ (पीसीबी) –  येथील डॉ. डि. वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग, मॅनेजमेंट अँडरिसर्च येथे तृतीय वर्ष संगणक विभागात शिकत असणाऱ्या  प्रगती  नाईकरे हिने  नुकत्याच पार पडलेल्या एअर रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा खेळविभाग, सावित्री बाई फुले पुणेविद्यापीठामार्फत पी. एम. सिशूटिंग रेंज येथे करण्यात आले होते.

प्रगती अनिल नाईकरे हिला संगणक विभाग प्रमुख  प्रा. प्रतीक्षा शेवतेकर, प्रा. धुंडिराज देशपांडे, प्रा. रचना मुधुळकर यांचे सहकार्य लाभले. तिच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे  चेअरमन आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक (निवृत्त) कर्नल एस. के. जोशी, प्राचार्यां डॉ.  अनुपमा पाटील, कुलसचिव  वाय. के. पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.