Maharashtra

‘देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील’, शिवसेना मंत्र्यांचा दावा

By PCB Author

August 09, 2019

यवतमाळ, दि. ९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा होणार, यावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावे प्रतिदावे करताना दिसून येत आहे. अशातच शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा केला.

त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा करणारे राठोड यांनी सेनेच्या शीर्षस्थ नेत्यांना इशारा तर नाही ना दिला, अशी एक शंका राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

यवतमाळ–वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात लोकसभा निवडणुकीनंतर “शीतयुद्ध’ राहिलेलेच नाही. कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यामुळे राठोड कमालीचे नाराज आहेत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांना तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनोहररावांचे चिरंजीव इंद्रनिल यांनी वसेना प्रवेशाची घोषणाही केली होती. त्यामुळे सेनेत आपले खच्चीकरण केले जात असल्याची राठोड यांची भावना झाली असण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.