Pune Gramin

वयोवृद्ध महिलेवर केला चुलत दिराने बलात्कार

By PCB Author

September 19, 2019

मुळशी, दि. १९ (पीसीबी) – एका ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर तीच्याच चुलत दिराने (वय ५८) बलात्कार केल्याची घटना बुधवारी (दि. १८) रात्री मुळशी तालुक्यातील (जि. पुणे) एका गावात घडली. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पिडीत महिला आपल्या नवीन बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एकटी झोपली होती. त्यावेळी गावातील चुलत दीराने तीच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत महिलेने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यावरून पोलिसांनी दिराविरोधात भा.द.वी. कलम ३७६ नुसार  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.