शिवसेना आमदाराचा बेकायदा बॅनर्स लावल्याप्रकरणी व्यापारी सेलच्या अध्यक्षावर गुन्हा

0
779

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी कॅम्प परिसरात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसाचा व स्वता:ची शिवसेना व्यापारी सेलच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किशोर केसवाणी यांनी २९ ऑगस्टला विनापरवानगी बेकायदेशीर बॅनर्स लावला होता. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नगरसेवक हिरानंद ऊर्फ डब्बु किंमतराव आसवानी (वय ५१) यांनी फिर्याद दिली. आसवानी हे प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर केसवाणी मित्र परिवाराने पिंपरी कॅम्प परिसरातील वैष्णवी चौक व इतर ठिकाणी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसाची व किशोर केसवाणी यांची शिवसेना व्यापारी सेलच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याची जाहीरात करण्यासाठी बेकायदेशीर बॅनर्स लावले होते. मात्र, याबाबत डब्बु आसवानी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २८४, २४५ तसेच मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३, ४ नुसार किशोर केसवाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.