आमदार लक्ष्मण जगतापांची हॅटट्रीक; ३८ हजार ४९८ मताधिक्क्याने झाला विजय

0
1168

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चुरशी लढत पहावयला मिळाली. मात्र, ३८ हजार ४९८ मताधिक्क्याने जगताप यांचा विजय झाला आहे. त्यामुळे जगताप यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे.

चिंचवडमध्ये एकुण ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. मात्र, भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळाली.  राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा हा मतदार संघ आहे. या मतदारसंघात ५३.३८ टक्के मतदान झाले असून २ लाख ७८ हजार २३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

दरम्यान, या मतदार संघात ४९१ मतदान बुथवर मतदान झाला. २२ टेबलवर मतमोजणीच्या एकूण २३ फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीपासून जगताप व कलाटे यांच्यामध्ये चढाओढ पहायला मिळाली.

मात्र, सातव्या फेरीपासून जगतापांनी आघाडी घ्यायला सुरुवात केल्यानंतर मताधिक्य वाढत गेले. दरम्यान, आमदार जगताप यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच ६० हजार, २९७ मते मिळाली होती.