Entertainment

CBI कडून दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु; सुशांत आणि दिशा प्रकरणाचे धागेदोरे आता सीबीआय शोधणार?

By PCB Author

September 03, 2020

मुंबई, दि.३(पीसीबी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्यानंतर बरेच संशयास्पद प्रश्न उपस्थित झाले. आता सीबीआयनं या प्रकरणीचा तपास हाती घेतला आहे. तपासा दरम्यान दर दिवशी नवी नवी धक्कादायक माहिती समोर येतेय. आता सीबीआयने एकेकाळी सुशांतची मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या दिशा सालियन हिच्या मृत्यूचा तपास आता हाती घेतला आहे.

दिशानं इमारतीवरुन उडी मारून जीवन संपवलं होतं. सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिशेने आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूचा तपास करतेवेळी सर्वप्रथम सीबीआयनं कॉर्नरस्टोन कंपनीचा मालक असणाऱ्या बंटी सचदेव याला चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे बोलावलं आहे. बंटी सचदेव हा अभिनेता सोहेल खान याच्या पत्नीचा भाऊ आहे.

दिशा एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी मध्ये काम करत होती. कॉर्नरस्टोन कंपनी ही सुद्धा एक सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आहे. विराट कोहलीसारख्या आघाडीच्या क्रिकेटपटूपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं PR संबंधित काम या कंपनीकडून पाहिलं जातं. दिशा याच कंपनीत काम करत होती. मृत्यूपूर्वी ती सुशांतच्या एका चित्रपटाच्या PR चं कामही पाहत असल्याची माहिती समोर आली होती. आता सीबीआय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा आणि दिशा च्या आत्महत्येचा एकमेकांशी काही संबंध आहे कि नाही हे तपासून पाहणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासाला जोडूनच सीबीआय दिशाच्या मृत्यूची चौकशी करत असल्याचं कळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही सुरु होता. हि एक धक्कादायक माहिती समोर आली होती. शिवाय तिचा फोन फॉरेन्सिक टीमला तपासणीकरता पाठवण्यातही आला नव्हता. तिच्या आत्महत्येची तपासणी देखील केली नव्हती. आता सीबीआयने हे प्रकरण हाती घेतल्याने खुपश्या गोष्टींचा उलगडा होणार असल्याचा विश्वास वाटत आहे.