Bhosari – Pimpri Chinchwad Bulletin

भोसरीतील केमिकल शॉपमध्ये ४१ लाखांचा अपहार
दि.१७(पीसीबी)-मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ दरम्यान गुडविल केमिकल्स शॉप, गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात अमित श्रीरामजी दरक (४१, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र हनुमान कासट (आळंदी रोड, दिघी), संदीप ज्ञानदेव सदाशिव (आळंदी रोड, भोसरी) आणि रिक्षा चालक बाबुराव बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र कासट हा फिर्यादीच्या दुकानात नोकरीस होता. त्याने संदीप सदाशिव आणि बाबुराव बोराडे यांच्याशी संगनमत करून दुकानातील लिक्विड आणि पावडर केमिकल मालकाची परवानगी न घेता परस्पर विकले. या विक्रीतून जमा झालेली ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपये रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी मालकाची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई
पिंपरी, दि. १२ – भाजप आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व असलेल्या भोसरी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू कऱण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असून, विविध भागांतील रेड झोन व पूररेषेने बाधित बांधकामांवर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ मौजे भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील रेड झोनमधील एकूण ४ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,५०० चौ.फूट आहे. तसेच, १० एप्रिल २०२६ रोजी मोशी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील तसेच मोशी टोलनाका परिसर व दक्षिण लक्ष्मीनगर येथील नाल्यालगत असलेल्या एकूण ११ अनधिकृत पत्राशेड व आर.सी.सी. बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १४ हजार ६५१ चौ.फूट क्षेत्रफळावरील बांधकामे हटविण्यात आली.

याशिवाय, ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील आणखी ०५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ६ हजार १५० चौ.फूट आहे.
क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे व कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तसेच ‘इ’ क्षेत्रीय धडक कारवाई पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

उपअभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, क्षितिजा देशमुख यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण धडक पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. कारवाईदरम्यान कार्यालय अधीक्षक संजय घुले, अतिक्रमण निरीक्षक प्रविण लांडे, बीट निरीक्षक सचिन पाटील, आदिनाथ नागरे, दत्तात्रय छडीदार, शिवानी भगत, भाग्यश्री वंजारे तसेच एम.एस.एफ. जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ
महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी

दि.१०(पीसीबी) – राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ या कार्यालयाचे उद्घाटन (दि.९) महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे,प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी उपस्थित होते.

​या केंद्राच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की,ज्या मुलांकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मागे पडतात, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १००% मोफत सेवा मिळणार आहे.बाहेरून येणाऱ्या अनेक होतकरू मुलांना राहण्याची जागा शोधण्यापासून ते जॉब मिळवण्यापर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एजंटकडून त्यांची फसवणूक केली जाते. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्रे पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू केली आहेत. येथे नोंदणी, नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत मिळतील. ‘विनामूल्य नोकरी’ हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून तरुणांनी एका रुपयाचाही खर्च न करता या संधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या आतापर्यंत जवळपास दोन हजार युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहे.

​दहावी, बारावी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक फुगे प्रायमा,A विंग मधील तिसरा मजला ऑफिस नंबर १२ आणि चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर अशा दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त युवकांनी येथे नाव नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवावी.विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिलेआणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय…
महापालिका सभेत शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांचा घनाघाती आरोप

पिंपरी, दि. १३ – देशातील सर्वात भव्य अशा मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा स्मारकात मोठा भ्रष्टाचार असल्याचा विषय शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सर्वसाधारण सभेत चर्चेत आणला. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिले आणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय, अशी अत्यंत खरमरीत टीका त्यांनी सत्ताधारी भाजपवर केली आणि या प्रकल्पाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.

दोन वर्षांपासून सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करूनही पुतळ्याचे काम अर्धवट आहे. दोनच दिवसांपूर्वी सौ. उबाळे यांनी या प्रकरणाचा सर्व पर्दाफाश पत्रकार परिषदेत केला होता. मूळचे २५-३० कोटींचे काम ६०-६५ कोटींपर्यंत कसे गेले, कोणी नेले, त्याला जबाबदार कोण, तांत्रिक मान्यता कोणी दिली, मूळ एस्टिमेट अगोदरच फुगवल्याचे सौ. उबाळे यांनी उघड केले. आज महापालिका सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाच्या मूळ खर्चापेक्षा अधिकचा खर्च कसा झाला याचा जाब सौ. उबाळे यांनी विचारला. स्थायी समितीत या विषयावर खुलासा होईपर्यंत तो तहकूब करण्याचा निर्णय झाला आणि भाजपची मोठी नाचक्की झाली. आज महापालिका सभेत उबाळे यांनी हिंदुत्वाची मशाल घेऊन मिरवणाऱ्या भाजपला असे बोल सुनावले की त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
प्रशासनाला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून सौ. उबाळे या भयंकर संतापल्या. ज्या कंपनीकडे काम दिले ती धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी महापालिकेत कोणी, कशी आणली याची २०१४ पासूनची कुंडलीच उबाळे यांनी मांडली. फक्त महापालिकेच्या पैशावर धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी गेल्या १० वर्षांत इतकी मालमाल कशी झाली याचे काही दाखले सौ. उबाळे यांनी दिले. इंद्रायणीनगरला ४-५ बंगले झाले कसे झाले असा प्रश्नही उबाळे यांनी उपस्थित केला.
पुतळ्याची पहिली वीट रचली होती तेव्हापासूनच्या कामाची तांत्रिक तपासणी आणि खर्चाचा तपशिल उबाळे यांनी मागितला. छत्रपती संभाजी महाराजांची थोरवी इतकी आहे की विरोध करण्याता प्रश्नच येत नाही आणि आम्हीसुध्दा क्षात्रधर्म मानतो, असेही उबाळे यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाच्या कामात सुरवातीला जागा बदलल्यामुळे किमान १२ ते १५ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाले त्याची जबाबदारी निश्चित करा, हा पैसा कुणामुळे गेले याचे उत्तर द्या, अशी मागणी केली. कामाचे मूल्य अधिक दाखवल्याने आज तब्बल २५ कोटी वाया घालवलेत त्याची जबाबदारी कोणाची असा खडा सवाल सौ. उबाळे यांनी केला.
पुतळ्च्या नावाखाली कोणी लपायचा प्रयत्न करायचा नाही आणि यापुढे छत्रपती संभाजी महाराजांचे नावसुध्दा घ्यायचे नाही, असेही सौ. उबाळे यांनी ठणकावले. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले आणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय, अशा कठोर शब्दांते सौ. उबाळे यांनी भाजपच्या नेत्यांची अक्षरशः निर्भत्सना केली. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

भोसरीमध्ये बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोडवरील रोशन गार्डनसमोर, भोसरी येथे घडली.

भीमराया पाटील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत बसवराज आळगी (२५, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बस चालक कुलदीप माणिक थोरात (३२, दिघी आळंदी रोड, भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र भीमराया पाटील हा इलेक्ट्रिक दुचाकीवरून घरी जात असताना बसने त्याच्या गाडीला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. या अपघातात भीमराया बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चालक मदतीसाठी न थांबता बस घेऊन पळून गेला, मात्र नागरिकांनी त्याला काही अंतरावर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उपचारापूर्वीच भीमरायाचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

बालाजीनगर परिसरातील डांबरीकरणास सुरुवात माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या पुढाकारातून नागरिकांना दिलासा
दि.१३(पीसीबी)- प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात आज दुपारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ड्रेनेजच्या कामांमुळे संपूर्ण रस्ता उखडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक व दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.या दुरवस्थेवर वेळेत लक्ष देत, माजी नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्षा सौ. सीमाताई सावळे यांच्या पुढाकारातून महापालिकेच्या संबंधित विभागांना रस्ता डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी सज्ज करण्यात आले.

यादरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि ओल्या हवामानामुळे काम सुरू करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे काही काळ प्रलंबित राहिलेलं हे काम आजपासून प्रत्यक्षात सुरू झालं असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.ड्रेनेज योजनेअंतर्गत रस्ते खोदकाम झाल्यानंतर संपूर्ण बालाजीनगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत गेले होते. चालताना, वाहन चालवताना अनेक नागरिकांना अडचणी येत होत्या. विशेषतः शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि महिला वर्गाला याचा मोठा त्रास होत होता.या कामासाठी प्रभागातील प्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा करत महापालिकेकडे विनंती केली होती. अखेर आज या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे व सीमाताई सावळे यांचे आभार मानले आहेत.

बालाजीनगर हा प्रभाग क्रमांक ८ चाच महत्त्वाचा भाग असून, या भागातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही माजी नगरसेविका सौ. सीमाताई सावळे यांनी दिली.त्यांनी सांगितले की, “पावसामुळे काम काही दिवस थांबावं लागलं होतं. मात्र नागरिकांनी खूप संयम ठेवला आणि सहकार्य केलं. त्यामुळेच आज हे काम सुरू करता आलं. प्रत्येक नागरिकाच्या अडचणी मी स्वतःच्या अडचणी मानून काम करते. समाजहितासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे.

सीमाताई सावळे यांचा विकासकामांमध्ये अनुभव आणि प्रशासनातील दखलपात्र संवाद कौशल्य यामुळे अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे. बालाजीनगरसारख्या क्षेत्रांमध्ये विकासकामांची गरज ओळखून त्या तत्परतेने काम करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या काळात रस्त्याची दुरवस्था असूनही नागरिकांनी दाखवलेला संयम, शिस्त आणि सहकार्य हे खरोखरच प्रशंसनीय आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन आणि जनतेमधील हा विश्वासाचं नातं टिकून राहणं, हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद आहे.सध्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून, पुढील टप्प्यात परिसरातील अंतर्गत गल्ल्या व लहान रस्त्यांचेही डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक निधी व मनपाचे मंजुरीचे टप्पे पूर्ण झाले आहेत.सीमाताई सावळे यांचा सामाजिक भान, कार्यकर्तृत्व आणि नागरिकांशी असलेला संवाद हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी ताकद आहे. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत, जनतेच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केलं आहे.

पत्रकार व कुटुंबीयांसाठी येत्या रविवारी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी, दि. १७ :पिंपरी चिंचवड मराहाठी पत्रकार संघ व स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या वतीने येत्या रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी निगडी प्राधिकरणात पत्रकार व कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर व दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. या शिबिरात जपानी टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने फुल बॉडी चेकअप ( संपूर्ण शारीरिक तपासणी) केली जाणार आहे.

स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सेक्टर नंबर 27 प्राधिकरण, काड सिद्धेश्वर मठाशेजारी, शाळू एजन्सी शेजारी रविवारी सकाळी दहा ते एक या वेळेत हे शिबिर होणार आहे. जपानी टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने शरीराच्या पूर्ण तपासण्या करण्यात येणार आहेत. डॉ. महेंद्र पाटील,डॉ. अमित नेमाणे, तसेच डी वाय पाटील आयुर्वेद वैद्यकीय विभागाचे टीम विविध प्रकारच्या तपासण्या व मार्गदर्शन करणार आहे. मधुमेह,ट्युमर, गुडघेदुखी, हाडांचे फ्रॅक्चर, रक्तदाब,डोळ्यांचे आजार, अल्सर,कॅन्सर,विस्मरण, श्वसनाचे विकार,सोरायसिस, त्वचा विकार, दंतविकार,यूरिन इन्फेक्शन,पोटाचे त्रास,मुतखडा, याबाबतच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. संपूर्ण शरीर तपासणी बरोबरच आयुर्वेदिक चाचण्या दंत तपासणी डोळे तपासणी केली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सातुर्डेकर यांनी सांगितले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

रिमोटद्वारे होणारी १९ लाखांची वीजचोरी भोसरी एमआयडीसीमध्ये उघडकीस
भोसरी, दि. ६ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसीमध्ये गेल्या २ वर्षांपासून एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटचा वापर करुन केली जाणारी वीजचोरी महावितरणने नुकतीच उघडकीस आणली असून, या ग्राहकाकडून महावितरणने १९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हानी कमी करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहा. अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरु केली. तेंव्हा मे. गणेश प्रेसिंग या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले. वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य महावितरणने जप्त केले आहे. तसेच या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या ७७२७० युनीटच्या वीजचोरी पोटी १९ लाख १९ हजार ३६२ रुपयांचा दंड व २ लाख ३० हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

लायन्स क्लब भोजापुरतर्फे डॉक्टरांचा मानपत्र देऊन सन्मान
भोसरी, दि. 2 ( पीसीबी ) लायन्स क्लब भोजापुर गोल्ड च्या सेवावर्षाची सुरवात अतिशय भव्य झाली. बिर्ला हॉस्पिटलचे
प्रसिद्ध ह्रदयशल्य विशारद डॉ. समित चौता आणि प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. मेघनाद पडसलगीकर यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित केले. मान्यवर 20 डॉक्टरांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी होत्या कलियुगातील सावित्री प्रा अर्चना राचमाले (रियल लाईफ हिरो) कर्नल शशी राचमाले यांच्या सुविद्य पत्नी. आई पती आणि मुलाला झालेल्या दुर्धर कॅन्सरशी अविरत झुंज देऊन कॅन्सरला हरवणाऱ्या प्रा राचमाले यांनी उपस्थितांना आहार विहार व व्यायाम याबद्दल अतिशय सुंदर प्रबोधन केलं. झोन चेअरमन MJF ला मुकुंद आवटे यांच्या शुभहस्ते डॉक्टरांना सन्मानित केलं गेलं. तर भोजापुर च्या प्रथम लेडी प्रा तृप्ती शर्मा यांनी उपस्थितांच स्वागत केलं. क्लब मधील बहुतेक सर्व माजी अध्यक्ष व इतर सदस्य या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे; महेश लांडगेंनी अजितदादांविरोधात दंड थोपटले
दि . १८ ( पीसीबी ) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे, असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांविरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पिंपरी-चिंचवडचा विकास केला. पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो, असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे आता यावरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आता दिव्यांग भवन कोणी उभारले. याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. 2017ला पालिकेत भाजपची सत्ता आली, त्यानंतर हे दिव्यांग भवन यासंह अनेक विकास झाला. त्यामुळं या शहराच्या विकासात आमचं ही योगदान आहे. इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाहीच. मात्र, बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही. शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं? घंटा….. म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? आता गेली 30 वर्षे काय केलं असं जे जे येऊन सांगतायत, ते आम्ही कुठं नाकारत आहोत. तुम्ही केलं की पण आम्ही पण 2017 पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता, असे महेश लांडगे यांनी म्हटले.

आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं. आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत. खासदार अप्पा बरोबर आहे का? जे चांगलं ते चांगलं, मी कोणाला घाबरत नाही. पैलवान आहे, सर्वांना अंगावर घायची सवय आहे. स्पष्ट सांगताना माझा पाऊल डगमगणार नाही. देवेंद्र भाऊ करुन जातो आम्ही नाव दुसऱ्याचं लागतं. जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

महेश लांडगेंच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महेश लांडगे यांना सबुरीचा सल्ला दिला. फडणवीसांनी म्हटले की, महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत. आम्ही काम करतो अन श्रेय दुसरे घेतात. पण मी सांगतो की ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’ आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही अन आपलं श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळं फार चिंता करायचं नाही, आपण काम करत राहायचं. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिलं ना, जनतेने तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला दिलेलं आहे. आपण अनेक कामं केली, पण ते विषय आपण प्रतिष्ठेचे केले नाहीत. आता तुम्ही म्हणाले चिखलीचा टिपी नको, चला आत्ताच आयुक्तांना सांगतो तो टिपी फक्त स्थगित नाही तर तो रद्दच करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेची महती सांगताना म्हटले की, आपला विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. त्यामुळं हा विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. अर्थात जोपर्यंत वारी आहे तो पर्यंत हा विचार संपणार नाहीच. कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत वारी असणार आहेच. मूलतत्त्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांचे विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल. इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण हे नेहमी म्हणतो. मात्र जो पर्यंत सिवेज योग्यरीत्या होणार नाहीत, तो पर्यंत हे अशक्य आहे. त्यादृष्टीने आपण आज दोन एसटीपीचे लोकार्पण केले आहे, असे फडणवीसांनी  सांगितले.