Pimpri

CAA , NRC, NPR च्या कायद्याविरोधात पुणे येथे महिलांच आंदोलन

By PCB Author

January 22, 2020

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – CAA , NRC, NPR च्या  कायद्याविरोधात पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटजवळ दिल्ली येथील शाहीन बागच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले व बिबी फातेमा का”  पुणे का शाहीन बाग” महिलांनी आंदोलन सुरु केले.

यावेळी लेडी हवाबाई शाळेच्या मुलींनी सारे जहाँ से अच्छा ..हे गीत गायले. यावेळेस धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी  लेके रहेंगे आझादी … बेकारीसे आझादी , महंगाईसे आझादी,  CAA, NRC, NPR से आझादी अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात पुणे शहर जिल्ह्यातून असंख्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. रमिजा  आदिल खान, शिरीन जहीर शेख, मेघना चव्हाण, सबिया शेख, झकीया खान, फिरोज खान, सईदा खान, नुजत खान, बानू मेमन, फरीदा शेख, सलमा शेख, सबिरा शेख, किरण शेख, जुवेरिया पिनीतोड, सना खान, शोभा भोसले, श्रध्दा भिसे, नंम्रता राजपूत, मीना भट्ट, माधुरी सारथे, सुवर्णा उरड, उषा सारथे, नफिसा हकीम, अज़ीनुसा हकीम, रजिया खडके,  अमीरबी शेख, फरीदा सय्यद, शमशाद बानू खान व मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी इकबाल अन्सारी, मंजूर शेख, अमीन शेख, जावेद खान, रशिद शेख, हसन कुरेशी, फुरकान मंजूर शेख, धनंजय उरड, सुफियान कुरेशी, शाहनवाज शेख, बशीर शेख, जावेद शेख, अझहर सादिक शेख, करीम रहीममुल्ला, सादिक शेख, सिराज मेमन, जाकीर बागवान, अमोल केदारी, इद्रिस खडके, इफ्तेकार पटेल, सईद चौधरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.