Pune

बारा बलुतेदारांचा भाजपाला जाहीर पाठिंबा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र

By PCB Author

October 16, 2019

पुणे, दि. १६ (पीसीबी) – बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने महाराष्ट्रातील भाजपा महायुतीला पन्नास हजाराच्या जनसमुदायासमोर तळेगाव दाभाडे येथील सभेत जाहीर पांठिंबा दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले.

त्यावेळी यावेळी श्रीरंग बारणे, बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, मावळ विधानसभेचे उमेदवार बाळा भेगडे, प्रसाद लाड, नगरसेविका स्मिता रायकर, एकनाथ टिळे, बलुतेदार संघाचे मावळ अध्यक्ष प्रदीप वाळुंजकर, प्रदेश सचिव राजेंद्र पंडीत, नगरसेवक माऊली रायकर, उस्तव प्रमुख रोहीत यवतकर, शहराध्यक्ष राजेश भोसले, वैचारिक प्रमुख चंद्रकांत बावीस्कर, कार्यसदस्य सुजीत मगर, आळंदी अध्यक्ष सचिन राऊत यांसह बलुतेदार समाज बंधू-भगिनी उपस्थित होत्या.