Chinchwad

बबनराव आभाणे गुरुजी यांचे निधन

By PCB Author

July 29, 2019

थेरगाव, दि. २९ (पीसीबी) – थेरगाव गावठाण येथील बबनराव अर्जुन आभाणे-गुरुजी (वय ८४) यांचे शुक्रवारी (दि. २६) निधन झाले. त्यांनी ३३ वर्षे शिक्षक व ५ वर्षें मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली. तसेच थेरगावमधील पोस्ट ऑफिस ३० वर्षे सांभाळले.

थेरगाव व काळेवाडी परिसरात सामाजिक कार्य व थेरगाव येथे मंदिर उभारणी केली. वारकरी संप्रदाय आणि थेरगावातील बापूजीबुवा वारकरी मंडळाचे खजिनदार म्हणून २० वर्षे काम पाहिले. ते दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आभाणे यांचे वडील होत.