Pimpri

दुपारी एकपर्यंत पिंपरीत 21.69, चिंचवडमध्ये 26.41 तर भोसरी विधानसभेत 26.52 टक्के मतदान

By PCB Author

October 21, 2019

पिंपरी, दि. 21 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात 21.69, चिंचवडमध्ये 26.41 तर भोसरी विधानसभेत 26.52 टक्के मतदान दुपारी एकपर्यंत झाले आहे.

पिंपरी विधानसभेत 76,697 मतदारांनी मतदान केले असून भोसरीत 1,17,002 मतदारांनी दुपारी एक वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, तिन्ही मतदार संघात मतदारांमध्ये उत्साह असून सायंकाळपर्यंत मतदान टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.