जलतरण स्पर्धेत ॲक्वाटीक क्लबला विजेतेपद

0
669

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – तळवडे येथील सेंट अँस स्कुलच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सर्वाधिक ११६ गुण मिळवून ॲक्वाटीक क्लबने विजेतेपद पटकावले. तर ८० गुण मिळवून हार्मनी क्लब उपविजेता ठरला. बक्षीस वितरण माजी सनदी अधिकारी श्रीनिवास राव सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सेंट अँस स्कूलचे अध्यक्ष सी. जे फ्रांसिस, संचालिका ॲनी फ्रांसिस, मुख्याध्यापिका लिविया पी. व्ही, स्मिता नायर, ज्युडिट मायकेल, अनिशा कोळी, प्रज्ञा देवळे, सुवर्णा सूर्यवंशी, रमेश विपट, शशांक कुलकर्णी, विनय मराठे, भूपेन आचरेकर, नरेन आचरेकर, अनुराधा गाडगीळ आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट जलतरणपटू ठरलेले रिषभ दास आणि संजना पाला यांना प्रत्येकी ३ हजार बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत मुंबईचा विमान चतुर्वेदी (प्रथम), रुद्र इंगळे (द्वितीय), शार्दुल कंडुल (तृतीय), स्वरा शिंदे (चतुर्थ), सीआ शेट्टी (पाचवी-चौघे पुण्याचे) तर मुंबईचा आनिका भाटिया (सहावी) यांना वर्षभरासाठी दरमहा ५०० रु अशी शिष्यवृत्ती जाहीर केली. छत्रपती शिवाजी क्रीडांगण बालेवाडी येथे पार पडलेल्या २९ व्या स्पर्धेत १४ गटात ६० प्रकारात घेण्यात आल्या. राज्यातील ९०० जलतरणपटू सहभागी झाले होते.