अमृता फडणवीस यांच्या उपस्थीत २२ ऑगस्ट रोजी ठाण्यात १०० महिलांचा गौरव होणार

0
927

ठाणे, दि. १९ (पीसीबी) – समान संधीचा लढा यशस्वी झाल्यावर महिलांनी आपल्या सर्वांगिण विकासाचा निर्धार केला. आज त्यांच्यापैकी अनेक जणी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. अशा कर्तृत्ववान भगिनींची नोंद कलानिधी आणि ठाणेवैभव यांनी घेण्याचे ठरवले. शंभर `वुमन सबस्टन्स` पुरस्काराने महिलांचा सत्कार करण्यासाठी  अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

खडतर मार्गाने गेलेल्या आणि असंख्य आव्हाने पेलून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱया महिलांना ठाणेवैभवने शोधून काढले. कलानिधीने या उपक्रमास सहाय्य केले. या अभिनव उपक्रमाची सांगता करताना त्यास सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात येत आहे. नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या कर्परोग विषयी काम करणाऱया संस्थेला मदत करण्यात येणार आहे. गेली ४५ वर्षे प्रसिद्ध होणाऱया ठाणेवैभव म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ, अर्थकारणात असणारी कलानिधी सारखी संस्था आणि विहंग चँरिटेबल ट्रस्ट यांच्या मिलाफातून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.