शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके

0
712

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – सध्या देशात शेतकरी आत्महत्या मोठ्या होत आहेत. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०० वर्षांपुर्वी ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया एंड देयर रेमेडीज’ या इंग्रजी पुस्तकात शेतकरी, शेती व शेतीचे प्रश्न यावर लिहून ठेवले आहे. अशी माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी येथे दिली.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारलेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या स्टार प्रवाह वाहीनीवरील मालिकेचे १२८ भाग प्रदर्शित झाले. त्यानिर्मित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्यावेळी स्टार प्रवाह वाहिनीचे दिग्दर्शक व लेखक नरेंद्र मुधोळकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांची व्यक्तीरेखा साकारलेले मिलिंद अधिकारी, तरूण भीमराव साकारलेले अभिनेते संकेत कोर्लेकर, डॉ. आंबेडकरांची पत्नी रमाबाई साकारलेल्या शिवानी रांगोळे, तसेच डॉ. आंबेडकरांचा भाऊ आनंद साकारलेले पुष्कर शरद उपस्थित होते. तर हरी नरके यांनी या मालिकेच्या लेखन, संशोधन, सल्लागार व मार्गदर्शक टिमचे प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळली आहे.

हरी नरके म्हणाले की, “महापुरुष व कर्तृत्ववान स्त्रीच्या जीवनावर अनेक मालिका आहेत. मात्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मालिका नव्हती, त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीने बाबासाहेब यांच्या जीवनावर मालिका काढण्याचे ठरवले. खैरमोडे यांनी आंबेडकर यांच्या जीवनावरील लिहलेले बारा खंड तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले २२ खंड व १४४ चरित्र ग्रंथांचा अभ्यास करून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.”

नरके पुढे म्हणाले की, “बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घटना लोकांपुढे आल्या नाहीत. १०० वर्षापूर्वी बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर पुस्तक लिहिल असून ते पहिल्या खंडात ते प्रकाशित केले आहे. उद्योगिकरण केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे बाबासाहेब यांनी त्यावेळी लिहले होते. एकच मुल पुरे असे बाबासाहेबांनी आणलेल्या कुटूंब नियोजन कायद्यात 80 वर्षांपुर्वी म्हटले होते. मात्र, तो कायदा पास झाला नाही.”

मुधोळकर म्हणाले, “ही मालिका नसून आपला इतिहास आहे. सध्या स्टार प्रवाहाची या मालिकेत जितका 12 खंडांतील इतिहास महत्त्वाचा आहे. तेवढेच दाखवणार आहेत. स्टार प्रवाह फक्त तो काळ व इतिहास दाखवत आहोत. मात्र, काही काळानंतर मोठा विरोध होण्याची शक्यता असून डोक्यात दगडही पडू शकतात.”

मिलिंद अधिकारी म्हणाले, “शुटींगच्या पहिला भागात माझाच रोल होता, त्यामुळे माझ्या पायाखालची माती सरकली. मालिका १४ एप्रिलला प्रदर्शित होती. मात्र, १८ मेला सुरू झाली. मालिकाचा भाग प्रकाशित होईपर्यंत टेंशन होत. मात्र, पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर प्रेमाचा वर्षावर झाला.”

पुष्कर शरद म्हणाले, “जून मध्ये माझे शुट सुरू झाले. आनंदराव यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. मात्र, आताची पिढी खुप स्वार्थी होत चालली आहे.”

संकेत कोर्लेकर म्हणाले, “मला जागतिक दर्जाचे व्यक्तीमत्व साकारायचे होते. नायकाची नाही तर महानायकाची भूमिका करायची होती. त्यामुळे तणाव होता. आम्हाला जे यश आले त्याचे सर्व श्रेय बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला आहे.”

शिवानी म्हणाल्या, “रमाईबाई यांच्या जीवनामध्ये खूपच अडचणी निर्माण झाल्या. ही व्यक्ती रेखा साकारताना खूपच भीती होती, मी अनेक प्रसंगात भावूक झाले होते.”

बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांमध्ये होणार परिवर्तन

बाबासाहेबांमुळे आपले नुकसान झाले असे म्हणणारे काही लोक आहेत. मात्र, त्यांना खरा इतिहास कळणे गरजेचे आहे. तसेच लवकरच इतर भाषेत ही मालिका प्रसिद्ध होणार आहे. बुद्ध जयंतीला पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा प्रतिसाद मिळाला. एका बाजूला कोट्यावधी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. मात्र, एक छोटा वर्ग ती मालिका पाहत नाही. परंतू, तीही लोक बदलत आहेत. न बघणारेही ही मालिका बघत आहेत. माहित नसलेले बाबासाहेब आंबेडकर या मालिकेने पुढे येत असून बाबासाहेब हे दलितांचे नेते म्हटले जाते. मात्र, ते देशाचे नेते होते. पुढे शंभर वर्षे ही मालिका पाहिली जाणार आहे. तसेच मालिकेने पुढील काळात ५० ते ६० मालिका निर्माण होतील. असे यावेळी नरके यांनी सांगितले.