पुणे-पिंपरी चिंचवडला लॉकडाऊन सुरू

0
666

पुणे/ पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला १० दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे.  मध्यरात्री ( मंगळवार 14 जुलै) एक वाजता सुरु झालेला लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत कायम असेल. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.

पुणे शहरात सात तर पिंपरी चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. पेट्रोल पंप संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत

  • शहरातील सर्व कारखाने सुरू राहणार, कामागारांना पास सक्तीचा
  • दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद
  • 14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद
  • 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील
  • मटण, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद
  • 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटण, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.
  • 13 ते 23 जुलै या दहा दिवसात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील.

दरम्यान, पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने आधी विरोध केला होता. मात्र विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली. बैठकीत व्यापारी महासंघाने सामंजस्याची भूमिका घेत लॉकडाऊन मध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

पुणे, पिंपरी चिंचवड तसेच हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावात लॉकडाऊनजाहीर करण्यात आला आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये खालील गावांचा समावेश आहे –

हवेली तालुका : वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोर्हे बुद्रुक आणि खुर्द, डोणजे, खानापुर, थेऊर.

मुळशी तालुका : नांदे, भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे, हिंजवडी या गावात लॉकडाऊन