Chinchwad

प्राधिकऱणातील गजानन महाराज न्यास च्या माध्यमातून महिनाभर रोज ३०० लोकांना भरपेेट भोजन

By PCB Author

May 01, 2020

प्राधिकरण, दि.१ (पीसीबी) – कोरोना व्हायरस मुळे टाळेबंदीच्या काळात गेले महिनाभर रोज ३०० लोकांना भरपेेट भोजन देण्याचा उपक्रम प्राधिकऱणातील गजानन महाराज न्यास च्या माध्यमातून राबविण्यात आला.सरकारच्या आव्हनाला प्रतिसाद म्हणुन व सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून ३ मे पर्यंत ही सेवा सुरू ठेवत असल्याचे संस्थेचे कार्यवाह रामभाऊ पिसे यांनी सांगितले.

श्री गजानन महाराज सार्वजनिक न्यास चे वतिने पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आकृर्डी येथील उर्दु शाळा परिसरात जे बेघर लोक राहतात त्यांच्यासाठी ही अखंड सेवा सुरू आहे. १ एप्रिल पासून रोज संध्याकाळी पुर्ण‌‌ जेवण तयार करून वाटप करण्यात येते. महापालिकेचे अधिकारी बी. बी. कांबळे, राजु मानकर यांच्या सहमतीने हे अन्न दान सुरु आहे. आजपर्यंत व्यवस्थीत सुरु आहे. बिगर निवासी व्यतिरिक्त बाहेरील आलेल्या नागरिकांनाही अन्न वाटप सुरू आहे. संकटकाळात वेळोवेळी मदतीसाठी ट्रस्टचा सहभाग असतो, असे पिसे यांनी सांगतिले.