5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

0
399

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीतून वर्षा बंगल्यावर पोहोचले.

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.