Maharashtra

उस्मानाबादेतून तिकीट कापल्यानंतर रवींद्र गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत

By PCB Author

March 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – लोकसभेसाठी तिकीट डावलल्याचा रोष निवडणुकांमध्ये महागात पडू शकतो. हेच लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेतून तिकीट नाकारलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली. ‘वर्षा’वर काल मध्यरात्रीपर्यंत खलबते सुरु होती.

‘मातोश्री’वर काल दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र गायकवाडांची समजूत काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मध्यरात्री गायकवाड पोहचले. बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचे आश्वासन बैठकीतील चर्चेनंतर देण्यात आले.

उस्मानाबादेतून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.