12 नखी कासवांची तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

86

पुणे, दि.०३ (पीसीबी) : मा.पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पुणे-मुंबई रोडवर कान्हे फाटा येथे एक इसम कासवांची तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर गोपनीय माहितीचे आधारे कान्हे फाटा येथे सापळा लावून कासवांची विक्रीसाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने राकेश आबाजी पवार (वय 37 रा.कामशेत ता.मावळ जि. पुणे ) असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात असणाऱ्या बकेटमध्ये 12 नख्यांचे 02 कासव असे एकूण 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत पुढील कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र विभाग वडगांव मावळ यांचे ताब्यात आरोपीस मुद्देमालसह देण्यात आले आहे .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके , पोउपनि रामेश्वर धोंडगे , Asi प्रकाश वाघमारे, Pc प्राण येवले चालक काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.