11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! कारण…

105

मुंबई, दि. ६ (पीसीबी) : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील म्हणाले.

उत्तर प्रदेशात लखीमपूरला जी घटना घडली शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची. त्याचा निषेध 11 तारखेला केला जाणार आहे. आज मंत्रिमंडळातही याबाबत सर्वांनी खेद व्यक्त केलाय. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष देशातील शेतकऱ्यांविरोधात ज्या क्रुरतेनं वागत आहे, देशात जागोजागी सुरु असलेली शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे. लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे ज्या बेमुवर्तखोरपणे उत्तर प्रदेश सरकार आरोपींवर कारवाई करत नाही, त्याचाही निषेध झाला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले

WhatsAppShare