८ देशांच्या राजदूतांनी खासदार संभाजीराजेंकडून कोल्हापूर, सांगलीतील महापुराची घेतली माहिती

0
673

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  कोल्हापूर,  सांगलीतील प्रलयकारी  महापुराची दाहकता  आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. या महापुराची माहिती घेण्यासाठी ८  देशांच्या राजदूतांनी खासदार संभाजीराजे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  बैठक घेतली.

यावेळी जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी छत्रपती संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. त्यानंतर सर्व देशांच्या राजदूतांनी पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करण्याची  इच्छा व्यक्त केली.

याबाबत संभाजीराजे म्हणाले की,  गेल्या शतकभरात  इतका प्रलयकारी महापूर  पाहायला मिळाला नव्हता. या महापुरामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.  या महापुरात जवळपास ३० लोकांचा मृत्यू झाला. पशुधन आणि शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  दिल्लीत माझे चांगले आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा आगामी काळात महाराष्ट्राला फायदा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.