Pune

७६ टक्के नागरिकांचा बंडखोर आमदारांना पुन्हा मत देण्यास विरोध

By PCB Author

June 28, 2022

– आघाडीच्या दैनिक सकाळ ऑनलाईन सर्व्हेंतील निष्कर्श

पुणे, दि. २८ (पीसीबी) : दै. सकाळ ऑनलाईन सर्व्हेंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न होता बंडखोर आमदारांना तुम्ही मतदान करणार का, त्यावर महाराष्ट्रातील जनतेनं काय उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटची कॅबिनेट बैठक घेतली अशी चर्चा सुरु झाल्यानंतर मविआ सरकारला धोक्याची जाणीव झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असणाऱ्या राजकीय बंडखोरीची चर्चा वेगवेगळया माध्यमातून समोर आल्याचे दिसून आले आहे. तब्बल ७६ टक्के नागरिकांनी आपण बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आता आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार याविषयी वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहे. सध्या जो मुख्य प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे तो असा की, ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा मतदान जनता करणार का, त्याचे उत्तर सर्व्हेतून समोर आले आहे. ७६.३ टक्के लोकांनी आपण पुन्हा त्या आमदारांना मतदान करणार नसल्याचे सांगितले आहे. तर १२.५ टक्के लोकांनी आपण त्या आमदारांना मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सकाळचे समुह संपादक श्रीराम पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात दोन गट आहे. शिवसेनेतील हा बदल अनेकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. शिवसेनेतील गट हाही अभ्यासाचा विषय आहे. छगन भुजबळ पहिल्यांदा बाहेर पडले होते. शिवसैनिकांचा रोष सर्वांना माहिती आहे. या राज्यामध्ये आता पहिल्यासारखी काही परिस्थिती नाही. आता बंडखोर आमदारांना संरक्षण दिले आहे.