४७० वर्ष जुना रहस्यमयी किल्ला जो जमिनीच्या आत आहे. जिथे जायला लोक आजही घाबरतात…

0
602

या भल्या मोठ्या जगात भरपूर असे किल्ले आहेत ज्यांना रहस्यमयी इतिहास आहे…ज्यात स्वतःमध्ये अनेक रहस्ये आहेत. भारताचा एकमेव असा किल्ला जो जमिनीवर नाही तर जमिनीच्या आत मध्ये आहे. यात जमिनीच्या आतमध्ये शेकडो बोगदे आणि तळघर आहेत. जिथे जायला आजही लोक घाबरतात. सुमारे 400 वर्षांपूर्वी अफगाण राज्यकर्ता ‘शेरशाह सूरी’ येथे राहत होता. म्हणून या किल्याला ‘शेरगडचा किल्ला’ असे म्हणतात. हा किल्ला बिहारच्या रोहतास जिल्ह्यातही आहे. अफगाण राज्यकर्ता शेरशाह सुरीच्या या किल्ल्यात शेकडो बोगदे आणि तळघर आहेत. जे आजवर कोणालाही माहिती नव्हते असे म्हणतात.

कैमूरच्या टेकड्यांवरील या किल्ल्याची रचना इतर किल्ल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हा किल्ला बाहेरून कुणालाही दिसू नये म्हणून अशा प्रकारे बांधला गेला आहे. किल्ल्याला चार बाजूंनी जंगलांनी वेढलेले आहे, तर हा किल्ला दुर्गावती नदीच्या एका बाजूला वसलेला आहे.

किल्ल्यात जाण्यासाठी बोगद्यातून जावे लागते. असे म्हटले जाते की हे बोगदे बंद केल्यास किल्ला कोणालाही दिसणार नाही. येथे बांधलेल्या तळघरांबद्दल असे म्हणतात की ते इतके मोठे आणि भव्य आहे कि, एकाच वेळी तेथे १०,००० लोकांना सामावून जाऊ शकतात. येथे उपस्थित तळघरात बरेच दिवस अन्न आणि पाणी साठवले जाऊ शकते. या किल्ल्याच्या आत एक मोठी विहीर आहे, त्यात शेकडो वर्षानंतरही पाणी साचले जाते.

हा किल्ला अशा प्रकारे बांधला गेला आहे की जर शत्रू प्रत्येक दिशेला १० किमी दूर असेल तरी तो स्पष्टपणे येताना दिसू शकेल. असे म्हणतात की या किल्ल्यात मुघलांनी शेरशाह सुरी, त्याचे कुटुंब आणि हजारो सैनिक मारले आहेत.

हा किल्ला १५४० ते १५४५ च्या दरम्यान बांधला गेला आहे असे म्हणतात. येथे शेकडो बोगदे तयार केले आहेत जेणेकरून अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर पडता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बोगद्यांचे हे रहस्य फक्त शेरशाह सूरी आणि त्याच्या विश्वासू सैनिकांनाच माहित होते. या किल्ल्यातील बोगदा हा रोहतास गड किल्ल्याकडे जातो, परंतु इतर बोगदे कोठे आहेत आणि कोठे जातात हे कोणालाच माहिती नाही.

असे म्हटले जाते की शेरशहाचा मौल्यवान खजिना या किल्ल्यात कोठेतरी लपलेला आहे, मात्र तो आजपर्यंत कोणालाही सापडला नाही. किल्ल्यात बोगदे आणि तळघरांचे जाळे अशा प्रकारे पसरले आहे की लोक आत जाण्यास घाबरतात.