Banner News

३१ जुलै पर्यंत लॉकडाउन कायम

By PCB Author

June 29, 2020

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्र सरकार एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून ३१ जुलैपर्यंत हा टप्पा वाढवण्यात आला आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

या’ गोष्टींना परवानगी

– सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे. केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.

‘या’ गोष्टी बंधनकारक

  1. मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य 2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी 3. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही 4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध 5. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध