Maharashtra

२ नेत्यासह ७ नगरसेवक बांधणार शिवबंधन

By PCB Author

February 19, 2020

औरंगाबाद, दि.१९ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान किशचंद तनवाणी हे याआधी शिवसेनेतच होते. ते शिवसेनेचे आमदार आहेत.

मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावलले जातंय असे वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यासोबत ६ ते ७ समर्थक नगरसेवकही शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.