२ ऑगस्टपासून राममंदिर प्रकरणी दररोज सुनावणी-सुप्रीम कोर्ट

312

नवी दिल्ली, दि, १८ (पीसीबी) – २ ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ५ न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट करण्यात आले आहे. राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मध्यस्थ समिती ३१ जुलैपर्यंत काम करेल असंही कोर्टाने म्हटले आहे.

अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने ३१ जुलैपर्यंत अहवाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हा अहवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात होईल असेही कोर्टाने म्हटले आहे. याआधी मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यसस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो तेेदेखील पाहू असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.