२५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मंजुर करावे अजित पवारांची केंद्र सरकाराकडे मागणी

0
441

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मंजुर करावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता केली आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.