Maharashtra

२४ जानेवारीला सीएए विरोधात राज्यव्यापी बंद; ३५ संघटनांचा पाठिंबा!

By PCB Author

January 20, 2020

नागपूर, दि.२० (पीसीबी) – २४ जानेवारीला राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. तसेच एकूण ३५ संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आंबेडकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली. सीएएचा परिणाम फक्त मुस्लीम समाजावर पडणार नसून दलित समाजावरही याचा परिणाम होईल, असे ते म्हणाले आहेत.