Notifications

२२ लाख २७ हजार मतदार ठरविणार मावळचा खासदार; मतदार सोमवारी बजावणार हक्क

By PCB Author

April 28, 2019

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांतील २२ लाख २७ हजार ७३३ मतदार सोमवारी (दि. २९) मावळ लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण? हे निश्चित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान होत असून, मावळ आणि शिरूर मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदार मतदान करतील.